Search This Blog

Friday, September 10, 2021

संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे!

संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे! २१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक मानले गेले आहे! संगणक ही तंत्रज्ञानाचा एक अविष्कार आहे!आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा मुक्त वापर होतांना दिसतो! संगणकाच्या वापरामुळे अनेक अवघड आणि वेळखाऊ कामे सुलभ झाली आहेत! आपल्या दैनदिन व्यवहारात,रिजवेशन, हॉस्पिटल, शाळा, बँका, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने, कारखाने, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र, रुग्णालये, सरकारी-खाजगी कार्यालये सगळीकडे संगणकाचा वापर केला जातो. बऱ्याचदा आपल्याला हवी असलेली माहिती व कागदपत्रे संबधित कार्यालयात व्यक्तीशः न जाता इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर सहज उपलब्ध होतात. परीक्षेचे व नोकरीचे अर्ज भरण्यापासून त्याच्या निकालापर्यंत सर्व गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध होत असतात. याकरिता संगणकाचे शिक्षण घेणे अतिशय महत्वाचे आहे. पूर्वी ज्याला अक्षर कळत नसे त्यालाच निरक्षर म्हटले जाई, आता मात्र ज्याला संगणक वापरता येत नाही त्यालाही निरक्षरच मानले जाते, इतका संगणकाचा प्रभाव वाढला आहे. संगणकाचे शिक्षण घेऊन त्याचा व्यवसाय वा नोकरी म्हणून निवड केलेले कित्येक लोक कमालीचे यशस्वी झालेले आढळतात. अनेकांनी देश-विदेशात ‘तगड्या’ पगाराच्या नोकऱ्यादेखील मिळविल्या आहेत. म्हणूनच संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे